दौंड,ता.५ : केडगाव येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाप्रती भावना, मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी आम्हाला घडवले. असे विचार सर्व विद्यार्थ्यांनी मांडले. महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. नानासाहेब जावळे यांनी विचार प्रकट करताना आम्हाला शिक्षकांनी घडवले. तेच ज्ञान आपणापर्यंत पोहचविण्याचे काम करत आहोत. अंतर्गत गुणवत्ता विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मानसिक सुदृढ राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी विद्यार्थ्यांने वर्गात बसून शिक्षण घेतले पाहिजे. ही प्रवृत्ती आज कमी होत आहे.असे प्रतिपादन केले. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अनुराधा गुजर, डॉ. भाऊसाहेब दरेकर, डॉ. शाम वासनिकर,डॉ. अशोक दिवेकर,डॉ. तन्वीर शेख,डॉ. मनीषा जाधव,डॉ. ज्ञानदेव राऊत,प्रा.अरविंद मिंधे, डॉ. शोभा वाईकर व सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.संपदा सावंत यांनी केले.