केडगांव ता.दौंड येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, महिला कक्ष व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२७ रोजी ग्रंथहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या हंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व विशद व्हावे ही भूमिका ठेवण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापिका, प्राध्यापक व विद्यार्थिनी, विद्यार्थी उपस्थित होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथांची जोपासना करावी व ग्रंथांना गुरु मानावे या भूमिकेतून या दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी ग्रंथहंडी तयार करून ज्या विद्यार्थ्यांनी ग्रंथहंडी फोडून पुस्तकांना स्पर्श केला त्यांना ही पुस्तके भेट देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अनुराधा गुजर, महिला कक्ष प्रमुख डॉ.शोभा वाईकर, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.मनीषा जाधव यांनी केले होते.